गुरुवार, ३१ मे, २०१२

यादें

 यादें

अब तो याद आती है महफिल-ए-शमा मस्तानों की
हम भी जहां दिवाने हुआ करतें थे
न जाने कौन सी थी वो दुनिया
पल पल में सदियां जिया करते थे

दोस्तों की वो रंगत ना फिक्र कल के बातों की
करने को क्या नहीं था? क्या मजाल रोकनेवालों की
क्या किया किसने पूछा बेवक्त उठा करते थे
न जाने कौन सी थी वो दुनिया
पल पल में सदियां जिया करते थे

अब तो गुमसुम है वो गलियारा
सूना सूना हर आंगन-चौबारा
अब नहीं बनती बात जहां लाखों बना करते थे
न जाने कौन सी थी वो दुनिया
पल पल में सदियां जिया करते थे

राजनिती



चीजों की बढती किमतों ने

गरीबों को बदहाल किया

नेताओं ने सेकी रोटी

भूखों को हालाहाल किया

कौन पूछे भोली जनता को

बोलो किसको सहोकार मिला?

बहती हुई गंगा में

हमको तो मजधार मिला

क्या भविष्य इस देश का

सब नेतागिरी का धंदा है

बहुमुखिया इस देश में

राजनिती एक फंदा है

बुधवार, ३० मे, २०१२

तेल और महंगाई

तेल और महंगाई  

मोह माया की इस नगरी में
कौन जलावन भोग को?
गाडी जलाए तेल या
तेल जलाए गाडी को?

क्या न महंगा इस जहां में
केवल मौत ही तो सस्ती है
केवल बातों की है सेना हमारी
उजडी हुई ये बस्ती है

कौन खिलाडी इस खेल का
नेता चलाए बैलगाडी को
भूखे नंगों की इस दुनियां में
चड्डी संभाले नाडी को

रविवार, २७ मे, २०१२

एक गजल अपनी भी..

            गुजारीश

मैंने आंसुओं से अपने गुजारीश की है
आंख में ही बरसे यही फर्माईश की है


जख्मों को बहने दो कौन नहीं जख्म बिना
खून से ही सिंचने की अब साजीश की है

कौन कहे खुशी नहीं, फर्क ही क्या उसके बिना?
खूब हंसते रहने की अब आजमाईश की है

अब तो जिंदगानी गुजरेगी शिकायत बिना
मरकर जिंदा रहने की जो ख्वाहीश की है
                                      -अमर पवार

शुक्रवार, २५ मे, २०१२

मी माझ्यातला...

असे शब्दांना कितीदा कुरवाळीत बसायचे?
असे बरेचदा शब्दांनी आभाळ भरून आलं
पण ही धरीत्री मात्र
कोरडीच राहीली


बरच काही लिहायचं म्हणून
शब्द आसडून घेतले
हृदयातली आग पेटली तेव्हा
सगळे कसे करपून गेले..


पुष्कळदा पाहिलय
भावनांची हेळसांड होताना
अजूनही गळा भाजून जातो
गारठलेलंही पाणी घोटताना

मी किनारा अजूनही सोडलाच नाही
सबंध बुडालो जेव्हा किनाराच उरला नाही..

मिटलेल्या पापण्यांचा क्षीण अजूनही विरला नाही
ओघळणार्‍या आसवांचा ओघ अजूनही सरला नाही
म्हणता म्हणता कितीक लोटला काळ
लोट अश्रूंचा कुणा अजूनही कळला नाही


आई

कळत-नकळतच्या चुकांसाठी
कधी आईनं मला मारायचं
मग तिनच शिवलेल्या वाकलीखाली
हळूच येऊन रडायचं

धुसमुस-धुसमुस वाकळीखाली
फक्त मी एकटा
भोवताली घट्ट काळोख
आतून चेहरा तापलेला
       
तिच्या चेहर्‍यावरचा राग आठवत
माझाही गाल फुगायचा
डोळ्यांसमोर डोळे दरडविताना
डोळा उगीच भरायचा

कधी हुंदका अनावर होत
गालही चिंब भिजायचे
मग स्वतःचीच समजूत काढत
गालावरून हात सरकायचे

वाकळीत घट्ट लपेटून असताना
मग दोन हात सरकायचे
कुशीत घट्ट ओढत
हळूच पाट थोपटायचे

एक पदर अश्रू फुसत
हळूच ओला व्हायचा
गालावरचा फुगवा अन् डोळ्यांतला रूसवा
कुठच्याकुठे पळायचा

मग वाकळीखालीच ओल्या पदरानं
हळूवार काहीतरी गुणगुणायचं
ओल्या उबार्‍यात धुंद झोपताना
गालावर हसू खुलायचं
                           -अमर पवार

सोमवार, २१ मे, २०१२

देव

देव

माणसांच्या खुर्‍याड्यात
देव नवा ठाकला आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
पैशाशिवाय काही चालत नाही
 नेहमीच  ऐकावं लागतं
पैशासाठी कधी स्वतःलाही
भर बाजारात विकावं लागतं
आज माणसांच्या बाजारात देवालाही भाव आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
        
आज नाती-गोती सगळीच
क्षणासाठीच असतात
पैसा नसला गाठीला की
ती ही क्षणभरात फिरतात
आज पैसा बघून आयुष्याची  जीवनगाठही जुळत आहे
 मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
पैसा नसतो सगळं म्हणून
रडतानाही पाहिलं
पैसा नसता जीवंतपणी
सडतानाही पाहिलं
आज चलनाविना दुबळे आम्ही जीवनही गहाण आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
ठाऊक आहे तुला-मला
भरपूर काही अनमोल आहे
हृदयाचा टाहो फुटला की
सर्वकाही फोल आहे
आज हृदय पिचून बघितलं सरणालाही किंमत आहे
मनामनात आरती ज्याची
पैसा त्याचे नाव आहे
                                                                            - श्री अमर पवार

 

शनिवार, १९ मे, २०१२

एक मेणबत्ती म्हणाली..

एक मेणबत्ती म्हणाली..

"काय, माझ्यासारखं जळता येईल का ?
अंधारात कुणाचा सहारा होशील का ?"

मी मंद हासत म्हणालो..

" अग तूला मीच पेटतं केलय.."
मग तीही मंद हासत राहीली...
                - श्री अमर पवार

मंगळवार, १५ मे, २०१२


 एक फांदी संगे एकरूप झालो..


गोगलगाय.. गोगलगाय..  ' खय हत तिचे पाय?'





नदीचा काठ.. काय त्याचा थाट..










मंगळवार, १ मे, २०१२

नागफनी


आपल्या वनराजीतून एकाकी असणारी नागफणी..





एरव्ही काट्यांनी मढलेली...

पण  तिच्यावर फूल खूलू लागलं की..
                                                                      वाटते ना बहरलेली...