बसचा प्रवास म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव असू शकतो. त्यात ओळखीचे सहप्रवासी भेटले की थोड्या गप्पा-टप्पा आणि बरेच काही होऊ शकते.. बसच्या प्रवासातील एक गंमतीदार अनुभव - सोन्याचा कुडा.
एका मुंबईहून कोकणी आलेल्या चाकरमान्याला वास्तुशांती करावयाची होती पण समस्या अशी की पूजा विधीसाठी लागणारे पाच ब्राह्मण आणायचे कोठून. एका व्यक्तीने जवळच शहरात काशीहून पाच ब्राह्मण आले असल्याची खबर दिली. त्यांचा शोध सुरू झाला.. आणि काय झाले ते पाहूया या गजालीतून.
मालवणी गजालींची घसघशीत मालिका : गजाली - येकदा काय झाला.
Gajali-Yekada Kay Zala, Part 1 - Shenachi Gajal
मालवणी गजाली-येकदा काय झाला.. भाग १ - शेणाची गजाल
सुहासच्या शाळेतील जुन्या आठवणींतील ही एक कथा आहे. यात सुहास आपल्या शालेय जीवनातील खोडसाळपणाची एक गंमंत सांगतोय. गावी शाळेत अंगण शेणाने सारविले जाई. त्यातुन घडलेला एक मजेशीर किस्सा.
मालवणी गजालींची घसघशीत मालिका : गजालींचो खजिनो - येकदा काय झाला.
गजाली हा कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय.
यासाठी मात्र कोणता विषयच पाहिजे असं नाही. माणसं भेटली की साधारण 'येकदा
काय झाला' असं
म्हणून ज्या गजाली चालू होतात पण त्या कधी संपतील याची 'गजाल
सुधा काढू नको' असं म्हणतात. आणि म्हणतातच ना 'गजालीन
खाल्यान घो' ते काही उगीचच नाही. ते काहीही असो गजालींची मजाच
काही और आहे. काही गजाली या तश्या ठरावीक लोकांकडूनच ऐकायला बऱ्या वाटतात, त्याची
सर दुसऱ्याला नाही. प्रत्येकाची ढब वेगळी, आब
वेगळा त्यातून मिळणारा आनंदच काही वेगळा. अश्याच काही निवडक गंमतीदार गजालींचा
खजिना घेऊन येत आहोत 'गजालींचो खजिनो-येकदा काय झाला'.