शनिवार, १४ जून, २०१४

धूर..


मदमस्त नको बिनधास्त नको भलत्याच नशेचा चस्का
भल्याभल्यांची हवेत गेली
धूर होऊन कायमची सत्ता

मादक चीजेची मादक हवा
दर्प काळीज जाळी पून्हा पून्हा
क्षणात मस्ती क्षणात मजा
बात लपेल कशी सारा घडेल गुन्हा
क्षणाचीच धुंदी मग वाजेलच पूंगी
नाही दोस्त दुश्मन ज्याला  नशा पुरतीच ढोंगी
जीव लाखाचा गमवू नको लावून नशेचा जुलमी सट्टा
भल्या....१


गर्द अफिम गांजा कोकेन चौकट राजा
लागला नादी कुणी पूरा गेला वाया
बेहोशीचा रांझा त्याला मिळेल सजा
रक्त पेटेल नाही पूरी पेटेल काया
परतीचा रस्ता नाही  जीवाची लाही-लाही
बाजी फिरेल उराशी जीत तुझी होणे नाही
गडी लाखाचा पडशील उतानी पडून काळाचा हुकमी एक्का
भल्या...२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा