शनिवार, ३० मे, २०२०

मालवणी गजाली-येकदा काय झाला.. भाग १ - शेणाची गजाल

Gajali-Yekada Kay Zala, Part 1 - Shenachi Gajal मालवणी गजाली-येकदा काय झाला.. भाग १ - शेणाची गजाल सुहासच्या शाळेतील जुन्या आठवणींतील ही एक कथा आहे. यात सुहास आपल्या शालेय जीवनातील खोडसाळपणाची एक गंमंत सांगतोय. गावी शाळेत अंगण शेणाने सारविले जाई. त्यातुन घडलेला एक मजेशीर किस्सा. मालवणी गजालींची घसघशीत मालिका : गजालींचो खजिनो - येकदा काय झाला.

https://youtu.be/AqNZNZl5ibc

मालवणी गजाली-येकदा काय झाला

गजाली-येकदा काय झाला
गजाली हा कोकणी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. यासाठी मात्र कोणता विषयच पाहिजे असं नाही. माणसं भेटली की साधारण 'येकदा काय झाला' असं म्हणून ज्या गजाली चालू होतात पण त्या कधी संपतील याची 'गजाल सुधा काढू नको' असं म्हणतात. आणि म्हणतातच ना  'गजालीन खाल्यान घो' ते काही उगीचच नाही. ते काहीही असो गजालींची मजाच काही और आहे. काही गजाली या तश्या ठरावीक लोकांकडूनच ऐकायला बऱ्या वाटतात, त्याची सर दुसऱ्याला नाही. प्रत्येकाची ढब वेगळी, आब वेगळा त्यातून मिळणारा आनंदच काही वेगळा. अश्याच काही निवडक गंमतीदार गजालींचा खजिना घेऊन येत आहोत 'गजालींचो खजिनो-येकदा काय झाला'.

https://youtu.be/_X4N2Mjl6IU